विवाहितेचा दोन लाखांसाठी छळ ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

Married woman harassed for not bringing 2 lakhs for job : Crime Against four Including Husband चोपडा : नोकरी लावण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये न आणल्याने शहरातील पाटीलगढी येथील रहिवासी असलेल्या 31 वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह चौघांविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

छळ असह्य झाल्याने पोलिसात गुन्हा
चोपडा शहरातील पाटीलगढी येथील रहिवासी असलेल्या 31 वर्षीय विवाहिता सोनल कैलास पारधी हिला नोकरी लावण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून पती कैलास रतीलाल पारधी, सासू प्रमिलाबाई रतीलाल पारधी, जेठ भाऊसाहेब रतीलाल पारधी, जेठानी अनिताबाई पारधी, भैयासाहेब पारधी यांनी छळ केला. विवाहितेने पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला मारहाण व शिवीगाळ करीत फारकत देण्याचीही धमकी देण्यात आली. याप्रकरणी महिलेने चोपडा शहर पोलिस स्थानक गाठत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक प्रमोद पाटील करीत आहेत.