विवाहितेचा पैशांसाठी मारहाण करून छळ : पतीसह पाच संशयीतांविरोधात गुन्हा

Harassment of a married woman in Jalgaon to bring 40 lakhs जळगाव : घराचा हप्ता व कर्ज फेडण्यासाठी माहेरहून 40 लाख 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार शहरातील एमआयडीसी हद्दीत राहणार्‍या विवाहितेसोबत घडला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मागणी पूर्ण न केल्याने मारहाण
जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीतील एका भागातील माहेर असलेल्या विवाहितेचा हरीयाणा राज्यातील गुरगाव येथील अब्दुल अजीम अब्दुल कय्युब यांच्याशी रितीरिवाजानुसार विवाह झाला असून लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती अब्दुल अजीम याने घराचा हप्ता व कर्ज फेडण्यासाठी तसेच नणंद हिच्या कापड दुकानाच्या व्यापारासाठी बाहेरून 40 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्यामुळे याचा राग पतीसह सासरच्या मंडळींना आला. दरम्यान पतीने वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
बुधवार, 14 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पती अब्दुल अजीम अब्दुल कय्युब, सासू शहनाज अब्दुल कय्युब, दीर नदीम अब्दुल कय्युब (तिघे रा.गुरगाव, हरीयाणा), नणंद अफरीन जमील खान (मलकापूर), नणंद सदफ इम्रान बेग (वर्धा) या पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.