विवाहितेचा माहेरून दोन लाख न आणल्याने छळ : एरंडोलच्या पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा

Harassment of a married woman in Bhusawal for not bringing two lakhs भुसावळ : शहरातील माहेर असलेल्या व एरंडोल येथील सासर असलेल्या विवाहितेने माहेरून दोन लाख रुपये न आणल्याने सासरच्या मंडळींनी छळ केला. छळाला कंटाळून विवाहिता माहेरी आल्या व त्यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
शहरातील नुरानी मशिदीचया बाजूला असलेल्या ग्रीम पार्क भागातील रहिवासी यास्मीन बी.कासीम शाह (22) या युवतीच्या विवाहानंतर एरंडोल येथील पतीसह सासरची मंडळींनी माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहितेने येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पती कासीम शहा सलीम शाह (रा.कागदीपूरा, फुकटपूरा, एरंडोल), सासू मुमताज सलीम शाह, सासरा सलीम शाह रहेमान शाह, नंदोई शाह नासीर शाह व नणंद फरहीन बी युनूस शाह (रा.बैल बाजार, बंबाळा फाटा, फिरोज भंगारवाल्याच्या समोर, शहापूर, जि. बर्‍हाणपूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी पत्नी आणण्याची दिली धमकी
माहेरून दोन लाख न आणल्याने विवाहितेला ठार मारण्याची तसेच तलाख देवून दुसरी पत्नी आणण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद वीतकर पुढील तपास करीत आहे.