Harassment of Yaval’s wife: Case against four including Chincholi’s husband यावल : यावल शहरातील खाटीक वाडा परीसरातील माहेर असलेल्या 25 वर्षीय विवाहितेचा पती सह चौघांनी लग्नात मानपान आणि हुंडा व्यवस्थित दिला नाही म्हणून छळ करण्यात आाल. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चिंचोलीच्या आरोपींविरोधात गुन्हा
शहरातील अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गालगत असलेल्या खाटीक वाडा भागातील माहेर असलेल्या धनश्री सुनील अहिरे (25) या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह 12 सप्टेंबर 2020 रोजी सुनील मिलिंद अहिरे (रा.चिंचोली, ता.यावल) या तरुणासोबत झाला होता. विवाहानंतर पती सुनील अहिरे, सासू भारताबाई मिलिंद आहिरे, दीर अनिल मिलिंद अहिरे, दिराणी योगिता अनिल अहिरे (सर्व रा.चिंचोली, ता.यावल, हल्ली मुक्काम सुरत, उधना, गुजरात) या चौघांनी लग्नानंतर गुजरात येथे नेऊन, तुला मूलबाळ होणार नाही, तुझ्या भावाने लग्नामध्ये हुड्डा दिला नाही, तू अपंग आहे, तु मेंटल आहे असे बोलून नेहमी त्रास देऊन तिचा छळ केला व तिला माहेरी पाठवून दिले. छळ असह्य झाल्याने विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार बालक बार्हे करीत आहे.