विवाहितेचा विनयभंग, आरोपीला चार वर्ष शिक्षा

0
यावल न्यायालयाचा निकाल ; पाच हजारांचा दंडही
यावल :- 21 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपीला दोन वर्ष सक्तमजुरी तर इतर दोन कलमान्वये प्रत्येकी एक वर्ष अशी तब्बल चार वर्षे सक्तमजुरी आणि तीन कलमान्वये पाच हजारांचा दंड यावल न्यायालयाने सुनावला. महेंद्र गोरख चौधरी (रा.थोरगव्हाण, ता.यावल) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. 9 व 12 नोव्हेंबर 2016 रोजी हा गुन्हा घडला होता.
तक्रारदार विवाहिता 9 नोव्हेंबर 2016 रोजी तिचे पती व कुटूंबीय शेतात कापूस वेचणी करीता गेले असताना घरात एकटीच होती. त्याचवेळी महेंद्र गोरख चौधरी याने विनयभंग केला. बदनामीपोटी विवाहितेने घटना न सांगितल्याचा फायदा घेत आरोपीने पुन्हा 12 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी पुन्हा विवाहितेशी संपर्क साधला.  तत्कालीन पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रा.का.पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला. न्यायाधीश डी.जी.जगताप यांच्या समोर सरकारी वकील अ‍ॅड.जी.एम.बागुल व अ‍ॅड.फरीद शेख यांनी युक्तीवाद केला. न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून प्रमोद लोणे, आलीम शेख यांनी काम पाहिले.