विवाहितेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा

जळगाव : तालुक्यातील एका गावात शौचास जात असलेल्या विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी एकाविरुद्ध जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव तालुका पोलिसात गुन्हा
जळगाव तालुक्यातील एका गावात शुक्रवार, 15 एप्रिल रोजी विवाहिता तिच्या दिराणीसोबत शौचास जात असतांना प्रवीण उर्फ रावसू दिलीप काळे याने अश्लील भाषेत संभाषण करीत महिलेच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. ही बाब कुणाला सांगितले तर तुला सोडणार नाही, असे बोलून पळ काढला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन शनिवारी प्रवीण काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल लीलाधर महाजन करीत आहेत.