विवाहितेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा

Molestation Of Married Woman In Jamner Taluka : Crime Against One जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील 35 वर्षीय विवाहितेला शिविगाळ व मारहाण करण्यात आली तसेच घरात बेकायदा प्रवेश करून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी मंगळवारी जामनेर पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीताविरोधात गुन्हा दाखल
जामनेर तालुक्यातील एका गावात 35 वर्षीय विवाहिता आपल्या परीारासह वास्तव्याला आहेत. गावातील संशयीत दादाराव धेंडू जोगी याने मंगळवार, 27 डिसेंबर रोजी त्याच्या पत्नीला काहीही शिकवित असल्याचा संशयावरून महिलेला व तिच्या घरातील इतर एका महिलेला शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच महिलेच्या घरात घसून तिचा हात पकडून विनयभंग केला. या प्रकरणी जामनेर पोलिसात विवाहितेने धाव घेवून तक्रार दिल्याने संशयीत आरोपी दादाराव जोगी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक रामदास कुंभार करीत आहे.