जळगाव :घरासमोर भांडे घासत असतांना विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना 28 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेतील संशयित शेख कलीम शेख रफिक वय 20 रा. जुम्मा शहा, वखारजवळ, तांबापुरा यास एमआयडीसी पोलिसांनी रविवारी दुपारी 3 वाजता अटक केली आहे. तसेच न्यायालयात हजर केले.
तांबपुरा परिसरात विवाहिता 29 रोजी तिच्या घरासमोर भांडी घासत होती. यादरम्यान याच परिसरातील शेख कलीम शेख रफिक हा विवाहितेजवळ आला. त्याने विवाहितेचा लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. विवाहितेचे दीर संशयिताला पकडण्यास गेले असता, त्यांनाही शेख कलीम याने मारहाण करुन तुम्हाला बघून घेईन अशी धमकी देवून पसार झाला होता. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरुन संशयित शेख कलीम शेख रफिक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील, गुन्हे शोध पथकातील इम्रान मुदस्सर काझी यांनी शेख कलीम यास ताब्यात घेतले. रविवारी यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.