विवाहितेचा विनयभंग करीत मुलावर तलवारीने हल्ला

0

परस्परविरोधी तक्रार ; यावल पोलिसांकडून आरोपींची धरपकड

यावल- घरात घुसुन 35 वर्षीय महिलेचा विनयभंग करीत त्यांच्या मुलावर तलवारीने हल्ला केल्याची घटना सोमवारी घडला होती या घटनेत सहा जणांनी एकत्र येवून संगणमतकरीत पीडीत महिलेच्या मुलावर हल्ला केल्याने त्यास जळगावात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते तर सोमवारी मध्यरात्रीनंतर पीडीत महिलेच्या फिर्यादीवरून आर्म अ‍ॅक्ट सह विनयभंग,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दंगल आदी कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडीतेचा पती पोलिसांचा खबरी असल्याने हल्ला
शहरातील पंचशिल नगरातील रहिवासी 35 वर्षीय पिडीत महिलेच्या फिर्यादी नुसार सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेला त्यांच्या राहत्या घरी अशोक रामदास बोरेकर, सिध्दार्थ अशोक बोरेकर, नितन उर्फ तुषार अशोक बोरेकर, मनोज अशोक बोरेकर, लखन अशोक बोरेकर व संतोष नारायण बोरेकर सर्व (रा.श्रीराम नगर, यावल) या सहा जणांनी अनधिकृतपणे घरात प्रवेश केला व फिर्यादीचा पती हा पोलिसांचा खबरी असून तो पोलिसांना बातम्या देेतो त्याचा राग आल्याच्या कारणाने पीडीत महिलेचा विनयभंग करीत त्यांच्या जवळील तलवारीने तिच्या 25 वर्षीय मुलाच्या डोक्यावर, हातावर वार केले तसेच लोखंडी रॉडने मारहाण मारहाण केली व तिच्या मुलास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत घराची नासधुस करण्यात आली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून तपास पोलिस उपनिरीक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहे .

परस्परविरोधी गुन्हा
अशोक रामदास बोरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा मनोज, तुषार व सिद्धार्थ बोरकर व पुतण्या संतोष नारायण बोरेकर यांना विजय बंडू गजरे, निलेश विजय गजरे, अजय विजय गजरे, मधुकर बाबुराव सोनवणे, अविनाश मधुकर सोनवणे व गणेश गोकुळ मेढे (सर्व रा.यावल) यांनी आमच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करतो काय ? असे सांगत त्यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण केली. आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.