विवाहितेचा विनयभंग प्रकरणी आरोपीचा जामीन फेटाळला

0

यावल- तालुक्यातील साकळी येथील बसस्थानकावर यावल शहरातील एका 33 वर्षीय महिलेचा विनयभंग झाला होता तर या गुन्ह्यातील संशयीत मनोहर भिला पाटील रा.माधव नगर यास बुधवारी पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली तर शनिवारी न्यायालयात आरोपीच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला मात्र आरोपीचा एकाच विवाहितेचा विनयभंग करण्याचा दुसरा गुन्हा असल्याने न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला. तपास निरीक्षक डी.के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युनूस तडवी करीत आहेत.