विवाहितेची आत्महत्या : पतीविरोधात गुन्हा

भुसावळ : पतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याने पत्नीचा जाच वाढल्याने तिने आत्महत्या केल्याची घटना दीपनगर वसाहतीत 24 एप्रिल 2022 रोजी घडली होती. या प्रकरणी मयत विवाहितेच्या पतीविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
शरण्या पिल्लाई या विवाहीतेने 24 एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी मनोज पिल्लाई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मनोज याचे एका मुलीसोबत प्रेम संबंध असल्याने त्यात पत्नी शरण्या ही आडकाठी ठरत होती म्हणून पती मनोज हा पत्नी शरण्या हीला नेहमीच त्रास देत होता, मारहाण करीत होता, शारीरीक व मानसिक त्रास देत होता व त्यास कंटाळून पत्नी शरण्या हिने राहत्या घरात आत्महत्या केली, अशी फिर्याद मृत शरण्याचे नातेवाईक धनुजा मेझुवाना कार्थीयायनी (रा.पुलियूर, आलपुझा, केरळ) यांनी दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे करीत आहेत.