विवाहितेची आत्महत्या, पतीसह दिराला अटक

0
 यावल – तालुक्यातील कोळन्हावी येथील माहेरवाशीण विवाहितेचा हुंड्याकरीता छळ करीत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी  पती व दिरास अटक करण्यात आली तर दोघांना शुक्रवारी येथील न्यायालयाने 13 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
24 ऑक्टोंबर रोजी पिडीत विवाहितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता व त्याच दिवशी यावल पोलिसात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पती मुरलीधर उर्फ दीपक रघुनाथ शिरसाठ व दीर मुकेश शिरसाठ अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.