भुसावळ : बोदवड तालुक्यातील पळासखेडा येथील विवाहिता उज्ज्वला योगेश सुरवाडे (23) हिला मुल-बाळ होत नसल्याने सासरच्यांनी छळ केल्याने त्यास कंटाळून तिने सोमवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी विवाहितेचे वडील पवन दशरथ कोचुरे (55 रा.प्रिंपी अकराऊत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी पती योगेश पंडित सुरवाडे, सासरा पंडित दामू सुरवाडे व सासू नलूबाई पंडित सुरवाडे यांच्याविरुद्ध गुनहा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक बी.झेड.जाने करीत आहेत.