विवाहितेची आत्महत्या

0

पुणे । पती आणि दीर चारित्र्यावर संशय घेत असल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री १० वाजता कोथरूडमधील सुतारदरा परिसरात घडली.

अश्‍विनी रामचंद्र पवार (२९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचे वडील संतोष कदम (५५, रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. पती रामचंद्र गुणाजी पवार (३६) आणि दीर विलास गुणाजी पवार (४३) यांच्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

११ मे २००८ रोजी अश्‍विनीचे आरोपी रामचंद्रसोबत लग्न झाले होते. त्यानंतर सासरी नांदत असताना आरोपींनी तिच्या चारित्र्यावर संशयावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याला कंटाळूनच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चांदिवडे अधिक तपास करीत आहेत.