जळगाव। तालुक्यातील कटोरा येथील चौवीय वर्षीय विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. डॉ. स्वाती अभिजीत पाटील असे मयत विवाहितेचे नाव आहे.
डॉ. स्वाती अभिजीत पाटील या विवाहितेने मंगळवारी दुपारी गळफास घेतला. कुटूंबियांच्या लक्षात येताच विवाहितेस जिल्हा सामान्य रूग्णालया उपचारार्थ नेले असता वैद्यकीय अधिकार्यांनी विवाहितेस मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.