अमळनेर । चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील एका 26 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह जळोद-बुधगाव रस्त्यावरील पुलावरून तापी नदीत उडी घेतल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. कौटुंंबिक वादातून त्या विवाहितेने हे पाऊल उचलल्याचे समजते. दरम्यान या महिलेच्या मुलाचा मृतदेह आढळला असला तरी तिच्यासह तिच्या मुलीचा शोध मात्र रात्री उशीरापर्यंत सुरू होता.
रिक्षाने गाठले जळोद
चहार्डी येथील अनुराधा सिद्धार्थ वारडे(26) या महिलेने रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास दोन मुलांसह तापी नदीत उडी मारली. मुलगी सिद्धी सिद्धार्थ वारडे (04) आणि मुलगा जयेश सिद्धार्थ वारडे (पाऊने दोन वर्षे) ह्यांच्या सोबत आज सकाळी ही महिला कौटुंबिक वादामुळे सकाळी तिच्या मामाच्या गावी जळोद ता अमळनेर येथे आली होती. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अनुराधा हिने दोन्ही मुलांना रिक्षामध्ये बसून जळोद जवळील तापी नदी पुलावर आली व दोन्ही मुलांसह तिने तापी नदीच्या डोहात उडी घेवून आत्महत्या केली. एका महिलेने नदीत उडी घेतल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी पाहिल्याने लगेच पुलाखालील पाण्याच्या डोहात प्रवेश केला मात्र त्यांच्या हाती केवळ एक दीड वर्षाचा बालक मृत स्थितीत लागला. तर महिला आणि सुमारे चार वर्षाच्या मुलीचा शोध सुरू होता.
ग्रामस्थांनी घेतला शोध
अनुराधा ही आज बुधगाव येथे आजोबांकडे आली होती. दुपारी ती आपल्या एक चार वर्षाची मुलगी व दीड वर्षाच्या मुलासह रिक्षाने तापीच्या पुलावर आली. कोणाला काही समजण्यापूर्वीच तिने दोन्ही चिमुकल्यांसह पुलावरून तापी नदीत उडी घेतली. नदीत दोन लहान मुले बुडतांना वाळकी येथील अतुल राजपूत याला दिसली. त्याने आरडाओरड केल्याने, बुधगाव येथील ग्रामस्थांनी नदीत उडी घेतली. त्यांच्या हाती दीड वर्षाचा मुलगा लागला. मात्र त्याला बाहेर काढेर्पयत त्याचा मृत्यू झाला होता. विवाहिता व मुलीचा शोध घेण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी जळोद येथील पोलीस पाटील अशोक शिरसाठ थांबून होते. ही घटना चोपडा ग्रामीण पोलिसांनां समजल्यावर त्यांनी घटना स्थळी धाव घेतली तर अमळनेर पोलिसांनी ही घटना स्थळी जावून पाहणी केली घटना स्थळावर महिलेचे सासरे आणि इतर नातेवाईक घटना स्थळी महिला व मुलीचा शोध घेत आहेत.