In the case of the suicide of the married woman, two people, including her husband, were arrested in Pachora पाचोरा : वर्षभरापूर्वीच विवाह झालेल्या शहरातील 26 वर्षीय विवाहितेने सोमवारी पहाटे आत्महत्या केली होती. या प्रकरणी पाचोरा पोलिसात विवाहितेच्या पतीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी पती विनोद सुरवाडे (पाचोरा) व भोजराव खैरे (चाळीसगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
विवाहितेने केली होती आत्महत्या
पाचोरा शहरातील पुनगाव रोडवरील गणपती नगर भागात प्रिया विनोद सुरवाडे (26) या विवाहितेने सोमवार, 8 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गळफास घेतला होता. मयत प्रिया हिच्या भावाने बहिणीचा घातपाती मृत्यूचा संशय व्यक्त केला होता.
एक वर्षांपूर्वीच झाला होता विवाह
प्रिया रमेश शहादेव हिचा विवाह 30 ऑगस्ट 2021 रोजी पाचोरा येथील पुनगाव रोडवरील गणपती नगर भागातील महाराष्ट्र सुरक्षा मंडळात कार्यरत असलेले विनोद राजू सुरवाडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर प्रिया व विनोद यांच्यात किरकोळ कारणावरून नियमित भांडण होत होते. सोमवार, 8 ऑगस्ट रोजी गणपती नगर भागातील राहत्या घरात पहाटेच्या सुमारास प्रिया हिचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने मयत प्रिया हिचा भाऊ देवेन रमेश शहादेव याने घातपाताची शंका व्यक्त केली होती.
पतीसह दोघांविरोधात गुन्हा
या प्रकरणी मयताचे वडील रमेश भाऊराव शहादेव यांच्या फिर्यादीनुसार मयताचा पती विनोद सुरवाडे व भोजराव खैरे यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. दोघा आरोपींना पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया वसावे या करीत आहे.