विवाहितेच्या गळफास प्रकरणी दोघांना कोठडी

0

जळगाव । तालुक्यातील भादली गावातील 19 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्थानकात पतीसह सासु, सासरे यांनी विवाहितेस आत्महत्या करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पती व सासर्‍याला अटक केली असून त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. एम.वाय.नेमाडे यांच्यासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

भादली येथील अश्‍विनी यांचे डिसेंबर 2016 मध्ये गावातीलच किरण धनगर यांच्या लग्न झाले होते. सासू-सासरे त्रासाला कंटाळून साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपली. घरी पती किरण हे आल्यानंतर घटना उघडकीस येताच अश्‍विनी यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. परंतू, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. मयत आश्‍विनीची आत्या संगिता धनगर यांच्या फिर्यादीवरून पती किरण सुनिल धनगर, सासरे सुनिल हिरामण धनगर, सासु आशाबाई सुनिल धनगर व सायदाबाई हिरामण धनगर या चौघांविरुध्द नशिराबाद पोलिस स्थानकात आत्महत्या करण्यास भाग पाडल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज न्या. नेमाडे यांच्या न्यायालयात हजर केले असता पती व सासरे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.