जळगाव : घरात विवाहिता एकटी असल्याची संधी हेरत संशयीताने पिडीतेच्या घराचा दरवाजा ढकलून आतमध्ये प्रवेश करून विवाहितेला लज्जास्पद वागणूक दिल्याप्रकरणी दाखल गुन्हयाच्या खटल्यात सुभाष धनगर रा. डोमगाव (ता.जळगाव) याला एक वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा तसेच 01 हजार रूपये दंड,अशी शिक्षा न्यायालयाने मंगळवारी सुनावली. जिल्हा न्यायालयाचे न्या. अक्षी जैन यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
डोमगाव येथील 29 वर्षीय विवाहिता 13 मे 2015 रोजी घरात एकटी तर पती कामावर गेला होता. रात्री 09.30 वाजेच्या सुमारास दरवाजा लोटून विवाहिता खाटेवर झोपलेली असताना गावातील सुभाष धनगर याने काही एक कारण नसताना पिडीतेच्या घराच्या दरवाजा लोटून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विवाहितेशी सुभाषने लाास्पद कृत्य केले. घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केल्याने संशयीत हा घरातून पळू लागला. आवाज ऐकल्यानंतर पिडीतेच्या नातेवाईक महिला व तिच्या भावाने घराकडे धाव घेतली असता संशयीत सुभाष हा पळताना त्यांनी बघितले. या प्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपासअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर न्या. अक्षी जैन यांच्या न्यायालयात खटल्याच्या चौकशी कामकाजात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीता, महिला नातेवाईक, तपासाधिकारी यांच्या साक्षी तर सरकार पक्षाचा युक्तीवाद याबाबीं लक्षात घेत न्यायालयाने आरोपीला दोषी धरले. भादवी कलम 354(ए)448, 504,506 अन्वये एक वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा तसेच एक हजार रूपये दंड , दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. रंजना पाटील तसेच अॅड. गिरीष बारगजे यांनी कामकाज पाहिले.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; संशयितास तीन वर्ष कारावास
जळगाव : अल्पवयीन ही अनुसूचित जातीची असल्याचे माहिती असूनदेखील ती एकटी असताना घरात घुसून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी दाखल गुन्हयाच्या खटल्यात कुणाल पाटील (रा.धामणगाव) ता. चाळीसगाव याला जळगाव सत्र न्यायालयाने तीन वर्षाचा सश्रम कारावास तसेच दंड अशी शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायालयाचे आर.जे. कटारिया यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
सदर गुन्हयाचा तपास तपासाधिकारी तथा एसडीपीओ अरविंद बंडु पाटील यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या गुन्याच्या खटल्याच्या चौकशीचे कामकाज न्या. आर.जे. कटारिया यांच्या न्यायालयात चालले. त्यात सरकार पक्षातर्फे एकूण 06 साक्षीदार तपासण्यात आले. समोर आलेल्या पुराव्याअंती न्यायालयाने संशयीताला भादवी कमल 354 अ व बालकांचे लैगिक गुन्हयापासून संरक्षण कायदा कलम 8 प्रमाणे दोषी धरून तीन वर्षाची कारावासाची शिक्षा तसेच एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. भादवी कलम 452 खाली 01 वर्ष कारावासाची शिक्षा तसेच 500 रूपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसाची साधी कैदेची शिक्षा सुनावली. अ.जा.ज.अ.प्र.कायदा 1989 ची सुधारित कायदा 2015 चे कलम 3=1 डब्ल्यु, आय 2 या कलमांखाली 6 महिन्याची कारावासाची शिक्षा तसेच 200 रूपये दंड, दंड न भरल्यास 7 दिवसाची साधी कैद अशी सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. निलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले. या कामी पैरवी अधिकारी शालीग्राम पाटील यांनी मदत केली.