Extreme incident on the pretext of letting the married woman off the bike: Crime against both रावेर : मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील 35 वर्षीय विवाहितेला दुचाकीवरून अंतुर्ली येथे सोडण्याच्या बहाण्याने दोघा आरोपींनी शेतात नेवून विवाहितेवर अतिप्रसंग करीत बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता रावेर-सावदा रोडवरील सुकेद सनांसे यांच्या शेतात घडला. या प्रकरणी निंभोरा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यप्रदेशातील दोघांविरोधात गुन्हा
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील 35 वर्षीय विवाहितेला आरोपी चिंतामण विक्रम बारेला (नाचणखेडा, ता.बर्हाणपूर) व राजेश मुकेश बारेला (ईटारीया, ता.झिरण्या, खरगोन) यांनी शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता अंतुर्ली येथे सोडण्याच्या बहाण्याने विना क्रमांकाच्या दुचाकीवर बसवले मात्र काही वेळानंतर सावदा रस्त्यावरील सुकदेव सनांसे यांच्या शेतात महिलेला नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने सुटका करीत निंभोरा पोलिस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तपास हवालदार विकास कोल्हे करीत आहेत.