विवाहितेवर अत्याचार : आरोपीला अटक

यावल : सातपुड्यातील आदिवासी पाड्यावरील 42 वर्षीय विवाहितेवर वर्षभर लैंगिक अत्याचार केले. यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून तिला पळवून नेत जंगलात सोडून दिले. याप्रकरणी मंगळवारी यावल पोलिसांत संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. लसूणबर्डी पाड्यावरील पीडितेच्या फिर्यादीनुसार, गावातील लकडा गणपत बारेला याने ठार मारण्याची धमकी देत वर्षभर लैंगिक अत्याचार केले. यानंतर 15 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेच्या सुमारास महिलेस पळवून नेत धानोरा (ता.चोपडा) परीसरातील जंगलामध्ये सोडून पोबारा केला यानंतर पीडिता तेथून धानोरा येथे नातलगांकडे व तेथून ऊसमळी येथे भावाकडे आली. यादरम्यान तिचा पती तेथे आला. यानंतर विवाहितेने घडलेला प्रकार सांगितला. मंगळवारी यावल पोलिस स्टेशन गाठून त्यांनी गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक अजमल खान पठाण करत आहे.