अमळनेर । तालुक्यातील देवगाव-देवळी येथील एका 28 वर्षीय तरुणाने 24 वर्षीय विवाहित महिलेस पळवून नेवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलिसात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. देवगांव देवळी येथील सदर महिला ही 10 फेब्रुवारी पासुन हरवल्याची नोंद पोलिसात झाली होती. त्या दिवसांपासून 25 फेब्रूवारीपर्यंत याच गावातील योगेश युवराज महाजन याने या महिलेस फुस लावून पळवून नेले. त्यानंतर औरंगाबाद गौतम नगर येथे भाड्याने रूम घेऊन ते दोघ राहिले. सदर महिलेशी तरूणाने संबंध ठेवून तिचे शीलभ्रष्ट केले, अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यानुसार अमळनेर पोलिस स्थानकात भाग 5 गु.र.नं. 53/2018 भा.द.वी.कलम 376, 366, 344, 506 आणि अॅट्रासिटी 1989चे कलम 3(1)(10 )व 3(1) नुसार गुन्हा नोंद करण्यात आली असून पुढील उपविभागीय पोलीस अधिकारी रफीक शेख करीत आहेत.