विवाहितेवर अत्याचार; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

0

शहादा । येथील 36 वर्षीय महिलेला आपला मोबाईल दुरूस्तीसाठी टाकलेल्या दुकानदारांने महिलेच्या मोबाईलमधून तीचे फोटो व व्हिडीओ आपल्या मोबाईल मध्ये घेवून ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकारात शहादा पोलिस स्थानकात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय महिलेचा मोबाईल हा नादुरूस्त झाल्याने तिने मोबाईल दुकानदार आरोपी अमित मोतीला कोटरिया यांच्याकडे दुरूस्तीसाठी टाकला असता, महिलेच्या मोबाईलमधील तीने काढलेले फोटो व काही व्हिडीओ आरोपी अमित कोटरियाने महिलेला फोन करून फोटो व व्हिडीओबद्दल सांगून तीला ब्लॅकमेल करून वेळोवेळी अत्याचार केले. हा अत्याचार तिला सहन न झाल्याने सर्व गोष्ट आपल्या पतीला सांगून पती व दोन मुलांना सोडून पडित महिला माहेरी निघून गेल्या. मात्र, अमित कोटरिया सोबत गिरिश मोतिलाल कोटरिया व प्रदिप मोतीलाल कोटरिया सर्व राहणार शहादा ता.जि.नंदूरबार या आरोपींनी तीच्या माहेरी जावून तीला पुन्हा ‘शहाद्यात ये अन्यथा फोटो व व्हिडीओ व्हायरल करून’ असे सांगून ब्लॅकमेल करून अत्याचार व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी अमित कोटरिया सोबत गिरिश मोतिलाल कोटरिया व प्रदिप मोतीलाल कोटरिया सर्व राहणार शहादा ता.जि.नंदूरबार यांच्या विरोधात शहादा पोलिसात गुरनं 49/2018 मधील भादवी कलम 376, 506 व 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बी.डी.शिंदे करित आहे.