विवाहितेवर अत्याचार : भडगाव शहरातील घटना

Abuse Of 30 Year Old Married Woman in Bhadgaon : Crime Against Youth भडगाव : विवाहितेशी ओळख वाढवून दुकानदार असलेल्या तरुणाने शहरातील 30 वर्षीय विवाहितेवर अत्याचार केला शिवाय या प्रकाराचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी एकाविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सलग दोन वर्ष अत्याचार
भडगाव शहरात 30 वर्षीय विवाहिता ही आपल्या पती, आई-वडील व भाऊसह वास्तव्याला आहे. संशयीत आरोपी योगेश शिवाजी महाजन याने आपल्या दुकानावर बोलावल्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले तसेच शारीरीक संबंधाचे व्हिडीओदेखील काढले.

त्यानंतर हे व्हिडीओ पतीसह आई-वडील व भाऊला पाठवून देण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून वारंवार अत्याचार केला शिवाय अश्लिल शिवीगाळ करून धमकी देत असल्याने या प्रकाराला विवाहिता कंटाळली व तिने भडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने संशयीत आरोपी योगेश शिवाजी महाजन याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.