चाळीसगाव । तालुक्यातील दहिवद येथील सासर असलेल्या विवाहितेने घर बांधण्यासाठी माहेरून 1 लाख रुपये आणले नाहीत म्हणून तिचा शाररिक मानसिक छळ होत असत. या छळाला कंटाळून तिने विहिरीत उडी घेऊन दि 19 जून 2017 रोजी दुपारी 1:30 वाजेपूर्वी दहिवद शिवारात आत्महत्या केली तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह सासरकडील 5 जणांविरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहुणबारे पोलीस स्टेशनला
तालुक्यातील दहिवद शिवारातील शेतातील विहिरीत 19 जून 2017 रोजी दुपारी दीड वाजेपूर्वी साधना उर्फ सखुबाई अनिल महाले (28) रा दहिवद ता चाळीसगाव यांचा मृतदेह मिळून आला होता. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली होती. दि 19 जून 2017 रोजी रात्री 10:30 वाजता मेहुणबारे पोलीस स्टेशन ला मयत विवाहितेचा भाऊ मधुकर नानाभाऊ अहिरे (26, रा. भामेर ता. साक्री जि. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि त्यांची बहीण मयत साधना उर्फ सखुबाई अनिल महाले यांनी घर बांधण्यासाठी माहेरून 1 लाख रुपये आणावे म्हणून त्यांचे पती अनिल गंगाराम महाले, सासरा गंगाराम नथू महाले, सासू हिराबाई गंगाराम महाले, जेठ योगेश गंगाराम महाले व जेठानी रंजना योगेश महाले (सर्व रा. दहिवद ता. चाळीसगाव) हे त्यांना शारीरिक मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वरील 5 आरोपी विरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि दिलीप शिरसाठ करीत आहेत. आज सायंकाळी आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.