विवाहित गृहिणींना आत्मविश्‍वास देणारा आगळावेगळा ‘फॅशन शो’ ठरला रंगतदार

0

नेरुळ । स्त्री सशक्तीकरण व त्यांची सुरक्षा या संकल्पनेवर आधारित तसेच बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश देणारा मॅस्टिक 2017 या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले. हा कार्यक्रम फॅशन शो न ठरता एक प्रेरणादायी कार्यक्रम ठरला असे म्हणता येईल. कारण लग्न झाल्यावर महिलांच्या जबाबदार्‍या वाढतात अशातच त्यांना व्यासपीठ मिळाले तर त्यांना स्वतःला सिद्ध करण्यास संधी मिळते. फॅशन डिझायनर जुवेरिया नुसरत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन वाशी येतील फोर पॉईंट हॉटेल येथे केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अभिनेता एजाज खान, मिसेस अर्थ आणि मिसेस इंडिया प्रियांका खुराणा गोयल, अभिनेता राहुल कपूर, बॉलीवूड डिझाइनर विशाल कपूर, रेडिओ जॉकी अनुराग पांडे, उद्योजक संजीव कपूर व इतर कलाकार उपस्थित होते.

मॉडेल्सनी केला रॅम्प वॉक्
गृहिणींना फॅशन शोच्या माध्यमातून आत्मविश्‍वास वाढावा या हेतूने फॅशन डिझायनर जुवेरिया नुसरत यांनी डिझाइन केलेले कपडे घालून महिलांनी तसेच नामवंत मॉडेल्स यांनी रॅम्प वॉल्क केला. नवी मुंबईतील 40 गृहिणींनी चार आठवडे मेहनत घेऊन हा फॅशन शो यशस्वी केला. यादरम्यान, व्यायामावर विशेष लक्ष्य देण्यात आले. कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष होते. स्त्रीच्या लग्नानंतर त्यांच्या जबाबदार्‍या वाढतात व कर्तव्य पार पाडून आपले कलागुण सादर करण्याकरिता मॅस्टिक 2017 हा कार्यक्रम एक व्यासपीठ ठरला. आनंदाची गोष्ट म्हणजे नवी मुंबई शहरात फॅशन शो होतात व त्याची फॅशन क्षेत्रात चर्चा होते ही अभिमानाची गोष्ट आहे. असे हेल्पइंग हॅन्ड फाउंडेशनच्या संस्थापिका फॅशन डिझायनर जुवेरिया नुसरत म्हणाल्या. या कार्यक्रमाला नवी मुंबईकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.