विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू

0

जामनेर । शहरातील शास्रीनगर भागातील विवाहितेचा अचानकपणे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. तर माहेरच्या नातेवाईकांनी घातापाताचा आरोप करीत उपजिल्हा रुग्णालयात दोन 3 तास वाद घातला. शहरातील शास्रीनगर राहणारे अशोक जाधव यांचा मुलगा रंजीत जाधव याचि पत्नी जयश्री रंजीत जाधव ही सासरकडील नातेवाईकांच्या म्हणण्यानूसार वाळलेले कपडे काढण्यासाठी गच्चीवर गेली असता. वरून गेलेल्या विजप्रवाहाचा जोरात धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारि 3.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान जयस्री जाधव यांना घरच्यांनी तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी जयश्री जाधव यांना मृत घोषीत केले. माहीती मयत जयश्रीच्या माहेरच्या नातेवाईकांना कळताच ते जामनेरला आले. आमच्या मुलीला तिचा पती व सासर कडील यांनी घातापाताणे संपविले असल्याचा आरोप करीत जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दोन तीन तास बराच वाद घातला. यावर जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी नातेवाईकांची समजूत घालीत.यात सासर कडील जर दोषी असतील. तर त्यांना कायाद्यानूसार शिक्षा मिळेल. शेवटी मयत जयस्रीच्या माहेरकडील नातेवाईकांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी धुळे येथे करण्याची मागणी. त्यानूसार मृतदेह रात्रीउशीरापंर्यत धुळे येथे नेण्याची प्रक्रीया चालू होती.