चर्होलीच्या संकल्प गार्डनमधील घटना
पिंपरी-चिंचवड : लग्नसमारंभात फोटो काढण्यासाठी स्टेजवर जाताना शेजारच्या खुर्चीवर ठेवलेली महिलेची पर्स पळवून चोरट्याने पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 81 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चर्होली येथील संकल्प गार्डन येथे रविवारी (दि. 28) रात्री नऊच्या सुमारास घडली. प्राची सोनावणे (वय 31, जुई नगर, नवी मुंबई) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
81 हजारांचा होता ऐवज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राची सोनावणे या एका लग्नसमारंभासाठी संकल्प गार्डन (चर्होली) येथे आल्या होत्या. फोटो काढण्यासाठी स्टेजवर जाताना त्यांनी आपली पर्स शेजारील खुर्चीवर ठेवली असता चोरट्याने पर्स पळवून पर्समधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि घड्याळ असा 81 हजार 800 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.