विवाह सोहळ्यासाठी ‘दीपवीर’ इटलीला रवाना

0

मुंबई : बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग आणि बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोण येत्या १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपासूनच त्यांच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे. आता ही जोडी विवाह सोहळ्यासाठी इटलीला रवाना झाली आहे.

https://www.instagram.com/p/Bp-zdcGl-XJ/?utm_source=ig_embed

विमानतळावरील या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन निघताना चाहत्यांच्या शुभेच्छांचाही त्यांनी स्वीकार केला. १४ नोव्हेंबरला दोघे पारंपारिक कोकणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. त्यानंतर बंगळुरुमध्ये २३ नोव्हेंबरला रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे.