विविधांगी नृत्याविष्कारातून अवतरल्या भारतीय लोककला

0

पुणे । ‘विठ्ठल विठ्ठलच्या गजरात रंगलेला पालखी सोहळा… शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात सादर केलेला शिवराज्याभिषेक दिन… आदिवासी नृत्य, काश्मिरी लोकनृत्य, दक्षिणी भरतनाट्य आणि हरयाणवी नृत्यापासून महाराष्ट्राची लोकधारा’ असे भारताच्या प्रादेशिक संस्कृतीचे, परंपरेचे दर्शन घडविणारा नृत्याविष्कार स्पर्धकांनी सादर केला. या स्पर्धेत एंजल हायस्कूलने यंदाचा तापडिया करंडक पटकाविला.

माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ संचलित महेश बालभवनतर्फे तापडिया करंडक आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी सेफपॅक इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक राजेंद्र तापडिया, संस्थेचे अध्यक्ष अतुल लाहोटी, कार्याध्यक्ष रमेश धूत, प्रकल्प प्रमुख अंजली तापडिया, महेश बालभवनच्या अध्यक्षा संगीता लाहोटी, गणेश मुंदडा, सुरेखा करवा उपस्थित होते.

निकाल : 1 ली ते 4 थी- द्वितीय क्रमांक विभागून – एंजल स्कूल, उरुळीकांचन आणि श्रीमती रत्नप्रभादेवी माहिते पाटील प्राथमिक शाळा, तृतीय क्रमांक विभागून – म.ए.सो. भावे प्राथमिक शाळा, परांजपे प्राथमिक विद्यालय, उत्तेजनार्थ – महेश विद्यालय मराठी माध्यम, सरहद स्कूल गुजर निंबाळकर वाडी आणि एंजल स्कूल लोणी काळभोर
निकाल : 5 वी ते 10 वी- द्वितीय क्रमांक विभागून – एमआयटी संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, ज्ञानगंगा इंग्लिश मीडीयम स्कूल, तृतीय क्रमांक विभागून – महेश विद्यालय मराठी माध्यम, आर्यन वर्ल्ड स्कूल, उत्तेजनार्थ – सिटी प्राईड स्कूल, निगडी, श्री सद्गुरु बाबामहाराज सहस्रबुद्धे विद्या मंदिर, महेश विद्यालय इंग्रजी माध्यम, अरानाझ रोझरी स्कूल, वारजे.