जामनेर । विविध आंदोलनाच्या माध्यमातून जन सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा निर्धार मनसेच्या जामनेर येथे पार पडलेल्या बैठकती पदाधिकार्यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा बैठक नुकतीच जामनेर येथील वाकी रोडवरील कार्यालयात पा पडली. शेतकर्यांना पीक कर्ज त्वरित मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीककर्जाचा पाठपुरावा
जिल्हाभरात पक्षाची नव्याने बांधणी करून कार्यकर्त्यांना सक्रीय करीत, विवीध आंदोलनांच्या माध्यमातून जन सामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठीचे प्रयत्नांचा निर्धार बैठकीत झाला. पक्षातील गट तटात विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून संघटन मजूबत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच शेतकरी बांधवांना सोसायटीचे पीक कर्ज त्वरित मिळावे या मागणीसाठी जिल्हा मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरले. बैठकीला कैलास लोखंडे, तालूकाध्यक्ष विलास राजपूत, नरेश पाटील, अनिल वाघ, संजय पाटील, राजेंद्र सांगडकर, डॉ.उमेश सपकाळे, मयुरी पाटील, संदीप हिवाळे, अशोक पाटील आंदीसह जिल्हा व तालूका पदाधिकारी उपस्थित होते.