विविध उपक्रमांनी अजित पवार यांचा वाढदिवस साजरा

0

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून अमित बच्छाव मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली. शेतकर्‍यांना रेनकोट व गम बुटांचे वाटप, ठिकठिकाणी वृक्षारोपण, लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच युवकांसाठी पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.

शेतकर्‍यांना रेनकोट वाटप
मावळातील सावळा गाव, पिंपरी, माळेगाव बुद्रूक येथील शेतकरी तसेच शेतमजुरांना रेनकोट व गम बुटांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी पिंपरीचे सरपंच कोकाटे, वन समिती सदस्य सोमनाथ बोराडे, नथ्थू आढारी, राजू पिंपरकर, वृंदा दाते, लक्ष्मण मेटल, कुमार साने, विलास राठोड, जगदीश पाटील, अजित इंगळे उपस्थित होते. तसेच, अमित बच्छाव मित्र परिवार, बंजारा मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, भीमसेना मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, शिवगर्जना मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ आणि क्रांती रायफल शुटींग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. कडूलिंब, वड, पिंपळ, गुलमोहर, महागुनी, औदुंबर, नारळ, चिंच यासारख्या देशी जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वृक्षांची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र माळी नियुक्त केला आहे. याप्रसंगी अमित बच्छाव यांनी पर्यावरण संवर्धनाविषयी मनोगत व्यक्त केले.

शैक्षणिक साहित्य वाटप
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिखली येथील विद्यार्थ्यांना विविध खेळांचे व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी योगवेंद्र जोशी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव, ज्ञानेश शिंदे, अभय लिमये, राहुल साबळे, सतीश कदम, रमेश राठोड, विलास राठोड, रवी राठोड, कुमार माने, अमोल लांडगे, आकाश शिंदे, श्रीनिवास बिरादार, अब्दूल मुकरताल, अवधूत चव्हाण उपस्थित होते. अमित बच्छाव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खेळांचे व शैक्षणिक साहित्य देण्यात आले.