चाकण/आळंदी : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती ठिकठिकाणी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त आळंदी येथे शिवसेनेतर्फे 500 कापडी पिशव्यांचे नागरिकांना मोफत वाटप करून प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले. तसेच आळंदी नगरपरिषदेच्या वतीने दारिद्य्र रेषेखालील 20 लाभार्थींना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. त्याचप्रमाणे खालुंब्रे येथेही अण्णा भाऊ साठे यांची जयंती जल्लोषात साजरी झाली. यावेळी संभाजी ब्रिगेड व खालुंब्रे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आळंदीत प्लास्टिक मुक्त अभियान
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आळंदी शहर शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. आळंदीतील काळे कॉलनी, प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे खेड उप तालुकाप्रमुख महादेव लिंभोरे, विभागप्रमुख सुरेश झोंबाडे, उप शहरप्रमुख संदीप पगडे, माजी मुख्याध्यापक नानासाहेब साठे, उद्योजक अविनाश तापकीर, सुनील धनवे, दादा भालेराव संजय तापकीर, संदीप कायस्थ, जालिंदर लांडगे, संतोष चव्हाण, सुनील शिंपी, सतीश गुंड, काका पालवे, तुकाराम पारवे, वसंत शिंदे उपस्थित होते. यावेळी नागरिकांना 500 कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले. रामशेठ गावडे यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. माजी मुख्याध्यापक नानासाहेब साठे, संदीप पगडी, सुरेश झोंबाडे आदींनी अभिवादन सभेत विचार मांडले. एन. जी. साठे यांनी आभार मानले.
गरजूंना गॅस कनेक्शनचे वाटत
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त आळंदी नगरपरिषदेतर्फे दारिद्य्र रेषेखालील 20 गरजूंना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. आळंदी नगरपरिषद कामगार युनियनतर्फेही अण्णा भाऊ साठेंच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारकापासून ‘स्वच्छता जनजागृती अभियानांतर्गत’ कामगारांनी शहरात फेरी काढून स्वच्छतेचा संदेश दिला. युनियनचे अध्यक्ष अरूण घुंडरे यांच्या नेतृत्त्वात जनजागृती करण्यात आली. नगरपरिषद कार्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रकाश जाधव, संतोष पवार, नगरसेवक सचिन गिलबिले, पांडुरंग वहिले, सागर भोसले, सविता गावडे, प्रतिभा गोगावले, आदित्य घुंडरे, तुषार घुंडरे, बालाजी कांबळे, प्रकाश कुर्हाडे, सुरेश झोंबाडे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, संजय तापकीर, सुरेश दौंडकर, आशा गायकवाड, गणेश रहाणे उपस्थित होते.
स्मारकासाठी जागेची मागणी
या कार्यक्रमावेळी मनोगत व्यक्त करताना सुरेश झोंबाडे म्हणाले की, आळंदीच्या वैभवात भर टाकेल, असे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक नगरपरिषदेने उभारावे, अशी मागणी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीची आहे. त्यासाठी आळंदी नगरपरिषदेने समितीला नऊ गुंठे जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. ही जागा समितीकडे हस्तांतरीत केली तर वैभवी स्मारक विकसित केले जाईल. समितीच्या वतीने लवकरच स्मारक विकसित करण्यासाठी काम सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आळंदी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक नगरपरिषद चौकात आल्यानंतर येथील शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात आली. आळंदी शहराध्यक्ष संतोष सोनवणे व बैजू काळे यांनी अभिवादन केले.
खालुंब्रेत प्रा. महादेव वाघमारे यांचे व्याख्यान
खालुंब्रे गावात संभाजी ब्रिगेड व ग्रामपंचायत खालुंब्रे यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी झाली. साठे जयंतीचे औचित्य साधून प्रा. महादेव वाघमारे (ज्यु. मकरंद अनासपुरे) यांचे प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होत. अण्णा भाऊ साठे यांच्या समतावादी पुरोगामी विचारांची आजही बहुजन समाजाला नितांत गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे खेड तालुकाध्यक्ष विशाल तुळवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्कर तुळवे, मावळ तालुका शेकाप नेते शरद मालपोटे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन सोमनाथ बोत्रे, गणेश आल्हाट, शिवाजी बोत्रे, बाळासाहेब साने यांनी केले. सूत्रसंचालन कालिदास बोत्रे यांनी केले. तर आभार आल्हाट यांनी मानले. यावेळी सरपंच सोनल बोत्रे, उपसरपंच गणेश बोत्रे, सदस्य कमल तुळवे, शैला बोत्रे, शोभा गाडे, अनिल बोत्रे, संदीप बोत्रे, माणिक तुळवे, हिरामण बोत्रे, माणिक पवार, योगेश बोत्रे, गोरख माने, रंगनाथ बोत्रे, कुमार साळवे, काळुराम साळवे, दत्ता पेटारे, संतोष साळवे, राकेश पेटारे, किरण खांदवे, बापू आल्हाट, अजय केदारी उपस्थित होते.