उपक्रमांसाठी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे व कमल घोलप यांचा पुढाकार
पिंपरी-चिंचवड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस रविवारी ‘सेवा दिन’ म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातदेखील प्रत्येक प्रभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. निगडी प्रभागाचे भाजप नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे व नगरसेविका कमल घोलप यांनी रविवारी ‘स्वच्छ भारत, स्वच्छ प्रभाग’ अभियान हाती घेऊन प्रभागातील कचर्यासंबंधी समस्या सोडविण्याचा निर्धार केला आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त निगडीत ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन
निगडी प्रभागातील यमुनानगर, सेक्टर 22 येथील अस्वच्छ रस्ते, उद्यान यांची नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे व नगरसेविका कमल घोलप यांनी स्वच्छता केली. नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत कचर्याचे वर्गीकरण करूनच कचरा जमा करण्याची आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजप नेते बापू घोलप, प्रभाग अध्यक्ष बाबा परब, भरत थोरात, किशोर हातागळे, श्रीकांत सुतार, कौस्तुभ देशपांडे, उमेश घोडेकर, रवी पाटोळे, दिलीप पवार, राकेश बावणे उपस्थित होते.