जळगाव । भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 128व्या जयंती साजरी करण्यात आली. स्व.नेहरुजींना लहान मुलं खुप आवडायची म्हणून त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणूनही साजरा करण्यात येत असतो. जिल्ह्यातील शाळांमध्ये बालदिनानिमित्त प्रभातफेरी काढण्याबरोबरच नृत्य, गायन, संभाषण असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच विविध शासकीय, अशासकीय, सामाजिक संघटना, राजकीय पक्षातर्फे पंडीत नेहरु यांची जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आदराजंली
जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत नेहरु यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी नेहरुच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोहर चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, चिटणीस मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार पंकज लोखंडे, विकास लाडवंजारी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीतर्फे अभिवादन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महानगरचे महानगराध्यक्ष निलेश पाटील व महानगरच्या महानगराध्यक्षा निला चौधरी यांच्याहस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन यांनी नेहरुंच्या राजकीय व सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देऊन मार्गदर्शन करुन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. याप्रसंगी डॉ.पी.एस.पाटील, मिनाक्षी चव्हाण, शोभा भोईटे, सतिश चव्हाण, राजू बाविस्कर, दीपक पाटील, किशोर आंबटकर, दीपक अस्वार, विनोद मोरे, पंकज जाधव, तुषार माळी, अर्जुन माळी, हिरामण मोरे, हुसेन तडवी, विजय मराठे, भरत पाटील, पवन पाटील, अविनाश मराठे, गोपाल राठोड, अमोल जगताप, सुरज खैरनार, अजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
खुबचंद सागरमल विद्यालयात नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने बालदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक सतिष साळुंखे, पर्यवेक्षक सुरेश आर्दिवाल,प्रविण पाटील, मंगला सपकाळे, सुनीता येवले, भास्कर कोळी, योगेंद्र पवार, राजेश इंगळे, कल्पना देवरे करुणा महाले आदी उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थीनी मेघना सोनार, साक्षी चौधरी यांनी पंडित नेहरू यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले.
भातखंडे विद्यालय
येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे विद्यालयात बाल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक जी.जे.पाटील यांनी प्रतिमा पूजन केले. या प्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बी.एन.पाटील यांनी बाबत माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. यावेळी आय.जे.पाटील, एन.यू.देसले, बी.एन.पाटील, एस.बी.भोसले, एस.एन.सोनवणे, एस.जे.सैदाणे, एस.बी.पाटील, नित्यानंद पाटील, संजय पाटील, सोपान पाटील, गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एन.पाटील यांनी केले. बाल दिनानिमित्त 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत मुली मध्ये प्रथम वर्षां रमेश पाटील दुसरी सोनी संतोष सोनवणे तर मुलांमध्ये प्रथम कन्हैया गोकुळ पाटील दुसरा एकलव्य भगवान भिल्ल यांना बक्षिसे देण्यात आली.
खुबचंद सागरमल विद्यालय
एरंडोल शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळांमध्ये बालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खडके बुद्रुक येथील बालगृहात पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांच्यासह, राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनेचे पदाधिकारी, महिला वाहकांनी बालगृहातील अनाथ मुलांसोबत बालक दिन साजरा केला. ग्रामीण उन्नती मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मेडियम स्कुल मध्ये बालक दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सचिन विसपुते, अंजुषा विसपुते, रुपाली जाधव, माधुरी तायडे, भाग्यश्री दर्शे यांनी, संदीप सातपुते, सुनील वानखेडे, उमेश पाटील, सचिव जितेंद्र सोनवणे, रामराव राठोड, संदीप भालेराव, मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, तुषार अहिरे, ज्ञानेश्वर पाटील, उज्ज्वल पाटील, सारिका पाटील, सोनाली अहिरे आदींनी परिश्रम घेतले.