आर.डी. पाटील यांना राष्ट्रीय लोकमित्र पुरस्कार

0

चोपडा । येथील पंकज विद्यालयाचे उपशिक्षक व किमया प्रकाशनचे संचालक आर.डी.पाटील यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ’राष्ट्रीय समता सन्मान सम्मेलनात धुळे येथे फुले, शाहू , आंबेडकर राष्ट्रीय लोकमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. धुळे येथील कल्याणभवन सभागृहात पुरस्काराचे वितरण जयेंद्रजी खुणे (पुरस्कार चळवळीचे राष्ट्रीय नेते) तसेच दिपिका पाटील (मिस इंडिया ) यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण प्रसंगी नीता माळी, शहनाज खान, पूनम कापस, सीमा गांगुली , ऋतुराज काळे, विजया मानमोडे, रेखा महाजन, मालती पाटील, भारती जगताप, कल्पना महाले, जयश्री अहिरराव, नरेंद्रजी अरोरा, गणपत गदगे, बाळासाहेब धंदर , संतोषकुमार कलोसिया, गजेंद्रसिंग दहिया, अस्मिता गोस्वामी, अतुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाशजी राणे, अशोक कोल्हे, पंकज बोरोले, नारायण बोरोले, भागवत भारंबे, गोकुळ भोळे, मुख्याध्यापक एम.व्ही,पाटील, व्ही.आर.पाटील, प्राचार्य डॉ.संभाजी देसाई, भाईदर पती, रेखा पाटील, नीता पाटील यांच्यासी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, नातेवाईक, मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे .