धरणगाव । येथील महाविद्यालयात जलप्रतिज्ञा सामुहिक घेण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टि.एस. बिराजदार यांनी पाणी हेच जीवन, पाण्याचे महत्व व पाण्याचे काटकसरीने वापर करून अपव्यय न करता पाणी बचत करावे असे आवाहन करून विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. पाणी अडवा, पाणी जिरवा दरवर्षी येणारी मोठी समस्या यावर उपाय म्हणून वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करावे तसेच दैनंदिन जीवनात पाण्याचे नियोजन करून योग्य तेवढा वापर करावा. विद्यार्थ्यांना जलदिवसाचे महत्व प्रत्येक घराघरात याचा संदेश पोहचवून पाण्याचे महत्व लोकांना समजवून सांगणे ही काळाची गरज आहे. पाण्याची होणारी नासाडी थांबविणे व त्याचा योग्य उपयोग करावा जल ही जीवन है असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वा.ना. आंधळे, उपप्राचार्य प्रा. एच.एम. मेहतर, पर्यवेक्षक प्रा. आर.आर. पाटील, कला विभाग प्रमुख प्रा. बी.एल. खोंडे तसेच सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी व विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चोपडा महिला माध्यमिक विद्यालय
चोपडा । येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात जागतिक जल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा प्रारंभ जल पूजनाने करण्यात आला. विद्यालयाचे पर्यवेक्षक सी बी माळी, जेष्ठ शिक्षक एस बी पाटील, बी जी माळी यांनी पाण्याच्या कलाशाचे पूजन करुन या प्रबोधन कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यावेळी मार्गदर्शन करतांना बी जी माळी यांनी सांगितले की, जगात वापरायोग्य पाणी केवळ 3 टक्के असून येणार्या काळात पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर एस बी पाटील यांनी पाण्याच्या वापरासंबंधी पाणी वाचवण्याच्या छोट्या छोट्या गोष्टी व पद्धती सांगितल्या. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी जल प्रतिज्ञा घेतली. यावेळी मंचावर राष्ट्रीय हरीत सेनेचे एस आर बारी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी आय लोहार यांनी केले.