पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील फर्ग्युसन,गरवारे, सिंम्बायोसिस अशा विविध महाविद्यालयांत 18 ते 21 वयोगटातील तरुण मतदारांच्या नोंदणीसाठी 31 जुलैपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. युवक मतदारांनी मतदार यादीत नावनोंदणी करावी असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी शहाजी पवार यांनी केले आहे.
महाविद्यालयातील परिसरात कॅम्पस अॅम्बेसिडरची नेमणूक केलेली आहे. ज्यांचे फोटो मतदार यादीत नाहीत त्यांनी फोटो मतदार नोंदणी अधिकारी तथा सेन्ट्रल बिल्डिंग येथील अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय येथे जमा करावेत. बीएलओमार्फत मयत, दुबार याबाबत पंचनामे करण्यात येत आहेत. नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक अधिकारी आशा होळकर यांनी केले आहे.