विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्याचे 9 ऑगष्ट रोजी सामुहीक रजा आंदोलन

0

अलिबाग – महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती मधील मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्चारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारक, यांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण न झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याकरीता येत्या 9 ऑगष्ट 2017 रोजी सामुहीक रजा आंदोलन आणि 21 ऑगष्ट 2017 पासून कामबंद आंदोलनाचे निवेदन अलिबाग नगर पालिकेतील कर्मचार्यांनी नगर पालिकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हेमंत चौधरी यांना दिले.

आंदोलन करूनही अद्याप ठोस भूमीका नाही
राज्यातील नगरपालिका, नगर पंचायतीमधील कार्यरत सर्व मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्चारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारक, यांच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात संघटनेमार्फत बरीच आंदोलन केली आहेत. त्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा ही करण्यात आला. शासन स्तरावर प्रलंबीत मागण्यांसदर्भात बैठका घेण्यात आल्या. मात्र अद्याप कोणतीही ठोस भुमिका घेतली गेली नाही. राज्यातील नगर परीषद नगरपंचायतींमधील कर्मचार्यांना राज्य शासकीय कर्मचार्यांबरोबरच 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करावा, वसूलीच्या प्रमाणात वेतनासाठी सहाय्यक अनुदान देण्याचा निर्णय रद्द करुन नगर परीषद, नगरपंचायतींमधील कर्मचार्यांना 100 टक्के वेतन शासनामार्फत द्यावे, जिल्हा परीषद, पंचायत समिती मधील कर्मचार्यांनुसार नगर परीषद कर्मचा-यांना सर्व लाभ देण्यात यावे यासह असंख्य मागण्यांचे निवेदन आज देण्यात आले.