विविध मागण्यांसाठी पत्रकारांचे आंदोलन

0

कर्जत । ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, छोट्या वृत्तपत्राच्या जाहिरातविषयक तसेच अन्य प्रश्‍न व मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी कर्जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन कर्जत तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याकडे देऊन आमच्या मागण्या सरकारकडे पोहोचवण्याची मागणी पत्रकारांनी केली. महाराष्ट्र अधिस्वीकृती समितीचे राज्य सदस्य संतोष पवार, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष विद्यानंद ओव्हाळ, माजी अध्यक्ष संतोष पेरणे, माथेरान प्रेस क्लबचे अध्यक्ष अजय कदम, दर्वेश पालकर, हेमंत देशमुख, संजय गायकवाड, विलास श्रीखंडे, कांता हाबळे, सुनील (दादा) दांडेकर, ज्योती जाधव, अजय गायकवाड, नरेश जाधव, बाळा गुरव, गणेश पवार, तेजस दाभणे, गणेश पुरवंत, दीपक पाटील उपस्थित होते.

सरकारविरोधात रोष
कर्जत तहसील कार्यालयात गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी कर्जत प्रेस क्लबच्या वतीने सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली तसेच राज्यभरात होत असलेली सरकारविरोधी निदर्शनाने पाहून आता तरी सरकारला याची खबरदारी नोंद घ्यावी, अशी मागणी सर्व राज्यभरातील पत्रकारांची असून गुरुवारी पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना देण्यात आले. पत्रकारांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, सर्व पत्रकारांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत कर्जत तहसील कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली. त्यावेळी सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला.