विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू परिषदेतर्फे आंदोलन

0

चोपडा । राष्ट्रीय हिंदू परिषदेतर्फे विविध मागण्यासाठी तहसिल कार्यालयातील आवारात आंदोलन करण्यात आले. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांना देण्यात आले. निवेदनात आतंकवादाला खतपाणी घालणारे डॉ.जाकीर नाईक यांच्या बंदी घातलेल्या ’इस्लामिक रिसर्च फाउंडेशन ’ही संस्था व त्यांच्या फेसबूक अकांऊट त्वरित बंद करण्यात यावी, साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या आरोपाखाली 8 वर्षे कारागृहात डांबणारे आणि अनन्वित अत्याचार करणार्‍या पोलिस आधिकारी व राज्यकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी.

नक्षलवाद राखण्यासाठी प्रत्न कर
नक्षलवादी कारवायात गूंतलेल्या देशद्रोही प्रा.नंदिनी सूंदर आणि मानवाधिकार कार्यकर्त्यां बेला भाटीया यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी चोपडा कृ.उ.बा.उपसभापती नंदकिशोर पाटील, हिंदू जनजागृती समितीचे यशवंत चौधरी, सूधाकर चौधरी, सुनिता व्यास, मनिषा माळी, रणरागिणी शाखेच्या क्षिप्रा जूवेकर, रागेश्री देशपांडे, सनातन संस्थेचे अनिल पाटील, भालचंद्र राजपूत, अशोक पाटील, डॉ.भरत पाटील, कूसूम पाटील, मंगला बारी, ज्योती माळी, अन्नपूर्णा माळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निलेश सोनार, चेतन बिर्‍हाडे, प्रवीण जैन आदी उपस्थित होते.