विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

0

जळगाव । गेल्या तीन वर्षापासून सत्तेवर असलेले सरकार सर्वच ठिकाणी पुर्णपणे अपयशी ठरले आहे. विधानसभा व लोकसभा या निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणावर दिलेली आश्‍वासने निव्वळ पोकळ निघाली असले तरी शेतकरी, कष्टकरी, डॉक्टर, मजूर, कामगार, लहान व्यवसायीक, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाले आहे. देशात झालेल्या नोटबंदी व जीएसटीमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. यासह विविध मागण्यांसाठी तसेच राज्य सरकाच्या या अनागोंदी आणि जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून हल्लाबोल आंदोलन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी तथा माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. तसेच विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना देण्यात आले.

ठळक मुद्दे
देशाची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. राज्यावर निवडणुकांपूर्वी अंदाजे दोन लाख कोटीचे कर्ज होते ते आज 4 लाख कोटी रूपयांवर येवून ठेपले असून राज्याच्या गरजेनूसार विषय सोडविण्यावर भर न देता अहमदाबाद ते मुंबई पर्यंत बुलेट ट्रेनवर कोट्यावधी रूपयांचा खर्च केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील मुख्य पिक कपासी असून त्यालाही हमी भाव नसल्याने शेतकर्‍यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढ आहे. त्यांची कुटुंबार संकटे निर्माण झाली आहे. जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणार घरफोडी, चोर्‍या, बलत्कारचे प्रमाण व इतर गुन्हे वाढत असल्याने सर्वसामान्य नागरीक सुरक्षित नसल्याने त्यामुळे सर्वसामान्य नागरिक नाराज झाली आहे.

आंदोलनात यांनी घेतला सहभाग
आमदार डॉ. सतिश पाटील, माजी खासदार ईश्‍वर बाबुजी जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, अल्पसंख्याचे गफ्फार मलिक, माजी आमदार अरूण पाटील, रविंद्रभैय्या पाटली, महिला आघाडीच्या कल्पना पाटील, ललीत बागुल, राष्ट्रवादी सेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हल्लाबोल आंदोलनात सहभाग नोंदवला.