विविध मागण्यांसाठी लोकजनशक्ती पक्षाचे आंदोलन

0

उड्डाणपूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे
पिंपरी : शहरातील सर्व स्मशानभूमींमध्ये स्वच्छता ठेवण्यात यावी, पाण्याची सोय करावी, गांधीनगर झोपडपट्टीत जास्तीत जास्त घरगुती शौचलये बांधण्यात यावेत, सांडपाणी व्यवस्था सक्षम करावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात बेकायदेशीरपणे लावण्यात येणार्‍या वाहनांवर कारवाई करावी, या मैदानाला संरक्षक भिंत बांधण्यात यावी, भीमसृष्टीचे काम लवकर पूर्ण करून 14 एप्रिल रोजी नागरिकांसाठी खुले करावे, उद्यानामागील मोकळ्या जागेत सांस्कृतिक भवन उभारावे आदी समस्या सोडविण्यासाठी समस्या सोडविण्यासाठी लोकजनशक्ती पक्षाच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

कंपन्यांची चौकशी करावी
शहरातील सर्व टपरी-पथारी-फेरीवाले आणि हातगाडीधारकांचे सर्वेक्षण करावे, शहर फेरीवाला धोरणाची लवकर अंमलबजावणी करावी, फुटपाथ खोदणार्‍या कंपन्यांची चौकशी करून त्यांना दंड आकारण्यात यावा, पुणे-मुंबई महामार्गावर दोन्ही बाजूंनी जास्तीत जास्त स्वच्छतागृहांची उभारणी करावी, पिंपरी चौकात वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या हातगाडीधारकांवर कारवाई करावी, पिंपरीतील उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे या समस्यांचेही उल्लेख करण्यात आला आहे.

या आंदोलनात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे, युवक अध्यक्ष धुराजी शिंदे, मराठवाडा कार्याध्यक्ष शिवाजी झोडगे, उत्तर भारतीय सेल पुणे जिल्हाध्यक्ष नसीम शेख, उपाध्यक्ष सचिन धेंडे, सरचिटणीस प्रवीण कांबळे, पुणे शहराध्यक्ष संजय आल्हाट, सदस्य अशोक कसबे, प्रसिद्धीप्रमुख विजय ढवळे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व महिला सहभागी झाले होते.