तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना दिले मागण्यांचे निवेदन
शहादा । शहादा शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पोलिस प्रशासनाने चिरडून काढले याचा निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पार्टी तर्फे तोंडाला काळ्या फिती लाऊन तहसीलदार कार्यालयात मुकमोर्चा काढला. नायब तहसिदार डॉ.उल्हास देवरे, पोलिस निरिक्षक संजय शुक्ला यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. भाकपा जिल्हा सेक्रेटरी माणिक सुर्यवंशी, ईश्वर पाटील, मोहन शेवाळे, दंगल सोनवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चधरी आदींसह ग्रामीण भागातील महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मुक मोर्चा हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून नगरपालिकेला वळसा मारून तहसिल कार्यालयात आणला व विविध मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार डॉ उल्हास देवरे व पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांना देण्यात आले.
मागण्या पुढीलप्रमाणे
9 एप्रिल रोजी शहादा पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, शेती मालाला हमीभाव द्यावा, खरीप हंगामासाठी शेतकर्याना अल्पदराने कर्ज उपलब्ध करुन द्यावे, शेतकर्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, शेतकर्यांना तीन हजार रुपये निवृत्ती मानधन द्यावे, सारंगखेडा-प्रकाशा बॅरेज, दरा वसुसरी धरणावर पाणी शेतकर्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी द्यावे, श्रावणबाळ व व्रुध्दापकाळ योजना पात्रतेची अट 60 वर्ष करावी, शहरातील गरिबांना घरकुल द्यावे, मोहिदा त.श.,सोनवल त.श., कवठळ, कहाटुळ या गावांसाठी तापी नदी वरुन कायमस्वरुपी पाणि पुरवठा योजना करावी, समशेरपुर साखर कारखाना शेतकर्यांचया ताब्यात द्या आदिंसह विविध मागण्याचे निवेदन दिले.