विविध योजनांसाठी अंतिम मुदत 20 जूनपर्यंत

0

कृषी विभागाचे शेतकर्‍यांना आवाहन

भुसावळ- महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (एनएचएम) सन 2018-19 अंतर्गत कांदा चाळ, शेततळे अस्तरीकरण, शेड नेट हाउस, पॉली हाउस, हरीत गृहात उच्च प्रतीचा भाजीपाला लागवड, हरीतगृहात उच्च प्रतीचे फूल पिके लागवड, ट्रॅक्टर 20 एचपी, स्प्रे पंप, पावर ऑपरेटेट स्प्रे पंप, पॅक हाउस, शीत खोली, पुर्व शीतकरण गृह, शीत गृह, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, अळंबी उत्पादन प्रकल्प, प्लास्टिक मल्चिंग, सामूहिक शेततळे (फक्त एससी,एसटीप्रवर्गाकरिता), प्राथमिक प्रक्रिया केंद्र (फळे, भाजीपाला, मसाला, हळद, मिरची, काजू, बेदाणा, मधुमक्षिका पालन, क्षेत्र विस्तार- स्ट्राबेरी) आदी घटकांचा लाभ घेण्याकामी इच्छूक शेतकर्‍यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन भुसावळ कृषी विभागाने केले आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांसाठी डब्लु डब्लु डब्लु हॉरनेट.गव्ह.इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक असून अर्जाची अंतिम मुदत 20 जूनपर्यंत आहे.

कृषी विभागाने जाहीर केली नियमावली
1 ते 20 जून या कालावधीमध्ये शेतकर्‍यांनी ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करावयाचा आहे. या कालावधीत नोंदणी केलेलेच अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. मागील वर्षीच्या प्रतीक्षा यादीतील तसेच सन 2018-19 मध्ये या जाहिरातीपूर्वी अर्ज केलेल्या सर्व शेतकर्‍यांनी नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. होर्टिनेट वर ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकर्‍याचा फोटो, 7/12 उतारा, खाते उतारा, आधार कार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक पासबुकाची प्रथम पृष्ठाची छायांकित प्रत, मोबाईल क्रंमाक (ओटीपीसाठी जवळ असणे आवश्यक) अनुसूचित जाती व जमातीसाठी जातीचा दाखला झेरॉक्स, अ‍ॅप्लिकेशन फॉर्म, हमीपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.

कागदपत्रे सादर करणे आवश्यक
अ‍ॅप्लिकेशन फॉर्म व हमीपत्र हॉर्टीनेट प्रणालीच्या होमपेज वर उपलब्ध आहे.ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ऑफलाईन पध्दतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज व वर नमूद कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन भुसावळ तालुका कृषी विभागाने केले आहे.