अमळनेर । पंचायत समितीचा कार्यभार हा माझ्यासाठी नवीन नाही. मुलगा किशोर अहिरे (श्याम अहिरे) हे 2006-07 या कार्यकाळात सभापती तर 2002 ते 2004 कार्यकाळात उपसभापती होते. त्या काळात तालुक्यात यशवंत ग्रामसमृद्धी योजना राबवून शासनाचा 85 टक्के निधी व 15 टक्के लोकवर्गणी जमा करून गावागावात काँक्रीट रस्ते तयार केले.
50 लाख रुपये खर्च करून तालुक्यातील तासखेडे येथील पाझर तलाव हा पं.स. सदस्यांच्या प्रत्येकी 5 लाख रुपये निधीतून तयार करण्यात आला. शिरुड कावपीप्री परीसरातील सर्व नाल्यांवर बंधारा बांधून पाणी अडविले. 13व्या वित्त आयोगांतर्गत व शेष फंडातून तालुक्यातील प्रत्येक गणात 10 गावांना विविध विकास कामासाठी विकास निधी वाटप ज्या गावात अंगणवाड्या नाहीत, अशा गावात अद्ययावत अंगणवाड्यांची निर्मिती करणे, जानवे आरोग्य केंद्र तालुक्यात अववल करणे, जानवे शिरुड गणातील शेतशिवार रस्ते मुरूम मी खडीकरण करून वापरण्यायोग्य करणे तसेच कावपिंप्री ते जानवे रस्ता डांबरीकरण करणे. मी स्वतः 2007 ते 2012 च्या कार्यकाळात पं.स. सदस्या असतांना शिरुड, रणाईचे या गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती केली. शिरुड, लोंढवे, जानवे, कोंढावळ येथील वृद्ध नागरिकांना इंदिरा आवास, श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना अशा विविध योजनाचा लाभ मिळवून दिला आहे.
पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविणार
जनतेने पुन्हा विश्वास ठेवल्यास गणातील सर्व गावात जि.प. व पं. स.च्या माध्यमातून विविध योजना आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार, शिरुड गणात नेहमी पाणी टंचाई हा सर्व सामान्य नागरिकांना भेडसावणारा प्रश्न आहे आणि केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांच्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढुन पाणी प्रश्न ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना त्यात शेतशिवार रस्ते, सिंचन विहिरी,गोठाशेड अशा विविध योजना प्रभाविपणे राबवून त्यांचा लाभ गरजू व होतकरू लाभार्थ्यापर्यंत पोहचविणार असल्याचे मत त्रिवेणीबाई पाटील यांनी व्यक्त केले.