शिरूर । केंदूर-पिंपळे जगताप येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
चौफुला येथील हनुमान मंदिर परिसराच्या दुरुस्तीसाठी पाच लाख आणि सोंडेकर मळा येथील रस्त्यासाठी पाच लाखांचा निधी देण्यात आला आहे. या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी गावातील विविध कामासंदर्भात सरपंच पुष्पा जगताप, उपसरपंच ऋषिकेश थिटे यांनी माहिती दिली. आमदार बाबुराव पाचर्णे यांनी पिंपळे जगताप गावाला जोडणार्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास यावेळी भाजपचे शिरूर तालुकाध्यक्ष भगवान शेळके, ग्रामविकास अधिकारी विलास शिंदे, माजी सरपंच दिपक बेंडभर, चेअरमन सुरेश बेंडभर, अशोक जगताप, पंडीत थिटे, शामकांत रायकर, विजय जगताप, महेश जगताप, सुधीर भोसले, सदस्या संगिता रायकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.