विविध विषरांवर ग्रामसेवकांना अधिकार्‍यांनी धरले धारेवर

0

शहादा  । शहादा तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायत मधील दोन टप्प्यात अनवेक्षण प्रक्रिया 14 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत राज्य समन्वयक के बी पाटील जिल्हा साधन व्यक्ती वासुदेव पाटील व महसूल साधन व्यक्ती सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. त्याचा महत्वाचा टप्पा म्हणून जनसुनावणी शहादा पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. या जनसुनावाइमध्ये तहसील व पंचायत समिती अंतर्गत असलेले कृषी विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरणविभाग, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांना पॅनल अधिकारी वि. सा. खंडागळे, सदस्य लतिका राजपूत, अनिल कुवर, राहुल ईशी साहेबराव बिरारे यांनी विभागनिहाय शासकीय कर्मचारी यांना धारेवर धरले.

जॉब कार्डच्या मुद्यावरून ताशेरे
नंदुरबार जिल्हा आदिवासी असून सुध्दा जॉब कार्ड कार्यालयीन प्रत व मजूर प्रत छापील स्वरूपात मजुरापर्यंत पोहचल्या नाहीत. जॉब कार्ड लवकरात लवकर मजुरांना देण्यात याव्या यासाठी अनिल कुवर व लतिका राजपूत यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. जनसुनावणी तालुक्याचे तहसीलदार मनोज खैरनार, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे ,सहाय्यक गटविकास अधिकारी गोसावी, व प. स. ग्रामसेवक रोजगार सेवक, कृषी सहाय्यक वनसंरक्षक व मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते या जन सुनवाईत तालुक्यातील सावखेडा ,असलोद सारंगखेडा, निंबोरा ,वरढे ,लांबोळा , लंगडी भवानी, ट्वळाइ ,खापरखेडा नागझिरी, कोटबांधणी ,दामळदा ,खरंगोन मानमोडया या ग्रामपंचायतीना धारेवर धरण्यात आले.