विविध समस्यांबाबत स्टेट बँकेला निवेदन

0

धरणगाव । सर्व शासकीय सेवांसाठी तसेच विविध प्रकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम भारतीय स्टेट बँकेत खाते असणे अनिवार्य समजले जाते. विद्याथ्यांची शिष्यवृत्ती असो की शासकीय योजने अंतर्गत कर्ज मिळवणे असो सर्व ठिकाणी स्टेट बँकेत खाते असणे आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या धरणगाव शाखेत विविध समस्यांचे ग्रहण लागलेले आढळून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शासनाचा लाभ घेणारे नागरीक व तालुक्यातील खेड्या पाड्यातून येणार्‍या ग्राहकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे यासाठी भारतीय स्टेट बँक शाखेला शिवसेनेतर्फे निवेदन देवून कारभार सुरळीत व्हावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी होणार्‍या घटनेस भारतीय स्टेट बँक जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे
भारतीय स्टेट बँक ही सर्वात विश्‍वसनीय बँक म्हणून ओळखली जाते. सर्व शासकीय सेवांसाठी तसेच विविध प्रकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम एसबीआय मध्ये खाते उघडणे आवश्यक असते मात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विविध जेष्ठ नागरिकांना वयोवृद्ध अनुदान कामी तसेच इतर नागरिकांना विविध योजनांसाठी बँकेत खाते आवश्यक आहे. परंतु आपल्या शाखेमार्फत विद्यार्थी व नागरिकांची खाते उघडण्यासाठी वणवण होत आहे तसेच अनेक विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याचे अर्ज हे 3 माहीन्यांपासून खाते पुस्तकासाठी टाळाटाळ करतात. कर्ज मिळणे कामी विविध योजना ह्या शासनाकडून प्रसिध्द होत असतांना व्यापर्‍यांना धरणगाव ऐवजी अमळनेर येथे कर्जासाठी जावे लागत आहे. विशेष म्हणजे धरणगाव तालुका असतांना इतर तालुक्यात गेल्याने तेथेही त्यांची वणवण होत आहे. शाखेमार्फत शेजारी असलेले एटीएम् मशीन हे निव्वळ शो पीस असल्याचे दिसून येते. एटीएममध्ये त्वरीत कॅश उपलब्ध व नागरिकांची गैरसोय थांबवावी. शाखेचे काही कर्मचारी वगळता इतर कर्मचारी हे ग्राहकांशी अत्यंत तुच्छ भाषेत ओरडतात, अन्य कर्मचारी वृद्ध व्यक्तींना अरेरावी करतात असे चित्र दिसून येते.

शाखेतर्फे सर्व ग्राहकांना महिन्याच्या सरासरी दोन हजार च्या खाली गेल्यास 80-90 रुपये दंड सोसावा लागत आहे. तो दंड नियमातून वगळण्यात यावी, वरील सर्व प्रकारच्या समस्यांवर शाखा अधिकारी यांनी जातीने लक्ष घालणे गरजेजे आहे व वरील सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात अन्यथा शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव यांच्या उपस्थितीत देण्यात आले. सोबत माजी आमदार हरिभाऊ महाजन, नगराध्यक्ष सलीम पटेल, शिवसेना गटनेते विनय भावे, सर्व नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, भागवत चौधरी, अहमद पठाण, अजय चव्हाण, युवा सेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, उपतालुकाप्रमुख राजेंद्र ठाकरे, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, भरत महाजन, रवींद्र जाधव, किरण अग्निहोत्री, पि.एम.पाटील, संतोष महाजन, कमलेश बोरसे, धिरेंद्र पुरभे, बुट्या पाटील, विशाल महाजन, वसीम पिंजारी, राहुल रोकडे, विलास महाजन, जितेंद्र धनगर, शरद पाटील, नंदकिशोर पाटील, जयेश महाजन, राहुल रोकडे, मोहन महाजन, धरणगांव तालुक्यातील नागरीक व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.