विविध सामाजिक संस्थांकडून शाडू मातीपासून मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण

1

पिंपरी- निगडी येथील साई नगरातील अण्णाभाऊ साठे सभागृहात विविध सामाजिक संस्थांनी मिळुन शहराच्या पर्यावरणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने शाडू मातीपासून गणपती मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम घेतला.

या उपक्रमात पोलीस नागरीक मित्र, इसीए, अ.भा.कार्यस्थ सभा, एकता मित्र मंडळ, जिजाऊ महिला बचत गट, दुर्गामाता महिला बचत गट, सिध्दी विनायक महिला बचत गट, संस्कुती महिला बचत गट, विश्व हिन्दु परिषद, द लाष्ट ट्रि आदी संस्थांनी पुढाकार घेतला.

प्रशिक्षणस्थळी पुणे रेल्वे स्टेशन मास्तर सुनिल कामठाण, वाय.सी.एम हाॅस्पीटलचे अभयचंद्र दादेवार, क्षध्दा हाॅस्पीटलच्या प्रणीला उर्नरकर आदींनी भेटी दिल्या.

राहुल श्रीवास्तव, किरण पाचपांडे, मुकेश सिग, स्मिता डेरे, विनीता आंबेरकर, कुसुम जवळकर, प्रियंका गोलार, उमेश दरेकर, राहुल यैवले, रजनी बोन्डे, अनामीका नारखेडे, उज्वला चौधरी, माधुरी भागवत, नंदकीशोर कुलकर्णी, आलोक त्रिपाठी व डाॅ.पांचपांडे आदींचे सहकार्य लाभले. श्री.त्र्यंबके आणि निलेश कोलते यांनी मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले.